सातारा

Kelghar Ghat: केळघर घाटातील वाहतूक बंदच

भूस्खलनाचा धोका कायम असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

पुढारी वृत्तसेवा

केळघर : महाबळेश्वर-मेढा मार्गावरील केळघर घाटातील काळाकडा येथे सोमवारी सायंकाळी कोसळलेली दरड हटवण्यात आणि त्यात अडकलेला जेसीबी बाहेर काढण्यात प्रशासनाला मंगळवारी दुपारी यश आले. मात्र परिसरात अद्याप भूस्खलनाचा धोका कायम असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवडाभरापासून जावली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. केळघर घाटातील काळाकडा परिसरात सुरुवातीला लहान दरड हटविण्यासाठी जेसीबी काम करत असताना मोठी दरड कोसळली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आणि जेसीबी दरीच्या बाजूला घसरून अडकला. प्रशासनाने तातडीने दुसरा जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले.

रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतिरिक्त यंत्रसामग्री मागवून मंगळवारी दुपारी दरड पूर्णपणे हटविण्यात आली आणि अडकलेला जेसीबीही सुरक्षित बाहेर काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT