वेणेगाव : काशीळ, ता. सातारा येथील हद्दीत महामार्गावर एका हॉटेलसमोर शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक जखमी झाला.
महामार्गावर दुचाकी घसरून दोघेही महामार्गाच्या कडेला फेकले गेले. यावेळी लोखंडी ग्रीलला धडकून एकजण ठार झाला. प्रथमेश नारायण जाधव (वय २२, रा. विजयनगर, पो. सुपने, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
दुचाकीचालक जयंत रामचंद्र जाधव (वय २५) हा युवक जखमी झाला आहे. प्रथमेश व जयंत हे दाेघे दुचाकीवरून निघाले होते. काशीळ हद्दीत आले असता त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दोघेही महामार्गाच्या कडेला फेकले जाऊन सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी ग्रीलला धडकले. यामध्ये प्रथमेशच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.