वेणेगाव : काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयासमोर कराड-सातारा मार्गावरील लेनवर दुचाकी डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातात अमीर हुसेन सनमानी (वय २६, रा. इब्राहिमपूर, ता. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक) या युवकाचा मृत्यू झाला.
या अपघातात एक जण गंभीर जगमी झाला आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या अपघातात अरबाज शहा (वय २३) हा युवक जखमी झाला आहे. अमीर सनमानी हा मित्रासह दुचाकीवरून कर्नाटकहून मुंबईच्या दिशेने जात होता काशीळ गावच्या हद्दीत त्याची दुचाकी आली असता दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडक झाली.
या अपघातात अमीर याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची महिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर सपोनि प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हवालदार अमोल गवळी व संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची माहिती घेतली.