पशुखाद्य 
सातारा

Satara News : पशुखाद्यात मिसळण्यासाठी आणलेला दोन टन युरिया जप्त

पोलिस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई; रॅकेट असण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

तासवडे टोलनाका : पशुखाद्यात मिसळण्यासाठी तब्बल दोन टन युरिया मिळाला कसा? यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने व तळबीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत युरिया आणला कोठून? तो दिला कोणी? यामध्ये कोणा, कोणाचा हात आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे. शेतीला युरियाचा तुटवडा निर्माण झाला असताना बाबर पशुखाद्य कंपनीला मात्र पशुखाद्यात भेसळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युरिया मिळत असल्याने खळबळ उडाली.

तासवडे एमआयडीसीत श्री फिल्ड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड बाबर पशुखाद्य ही कंपनी आहे. या कंपनीत जनावरे व पोल्ट्रीच्या कोंबड्यांना लागणारे पशुखाद्य तयार केले जाते. कंपनीत पशुखाद्य तयार झाल्यानंतर हे पशुखाद्य ट्रकने सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांतील शेकडो पशुखाद्य विक्री केंद्रांवर पोहोचवले जाते.

कृषी विभागाला एका कंपनीत युरियाचा साठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कृषी विभाग व तळबीड पोलिसांनी तासवडे एमआयडीसीत बाबर पशुखाद्य कंपनीवर धडक कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT