सातारा

Satara News: कराड उत्तरला २८६ कोटींचा निधी मंजूर, रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड रस्ता होणार क्राँक्रीट

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या महत्त्वाच्या रस्त्याला काँक्रीटीकरणासाठी तब्बल २८६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे.

राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या या निधीमुळे कराड उत्तरमधील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. हा रस्ता काँक्रीट झाल्याने स्थानिक नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

याबाबत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातील दळणवळण वेगवान व्हावे, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यावश्यक होते. २८६ कोटींच्या निधीमुळे कराड उत्तरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच उर्वरित रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्नशील आहे. कराड उत्तरच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून यापुढेही विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT