Kas pathar cleanliness campaign Pudhari
सातारा

Kas pathar cleanliness campaign: ‘कचरामुक्त कास पठार‌’साठी राबले चिमुकल्यांचे हात

वनविभाग सातारा यांच्यावतीने कचरामुक्त कास पठार या सामाजिक उपक्रमांतर्गत जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पुष्प पठार येथे व्यापक स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

सातारा : वनविभाग सातारा यांच्यावतीने कचरामुक्त कास पठार या सामाजिक उपक्रमांतर्गत जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पुष्प पठार येथे व्यापक स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली.

या मोहिमेत न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील एनसीसी व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सातारा वनविभागातील अधिकारी-कर्मचारी, कास पठार कार्यकारी समितीचे स्वयंसेवक यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. कास पठारासह आजूबाजूच्या परिसरातील तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा गोळा करण्यात आला. चोरटका ते कासानी पार्किंग, मुख्य गेट ते चोरटका तसेच नवरा-नवरी डोंगर ते वेस्टर्न घाट हॉटेल या मार्गावरील कचरा साफ करण्यात आला.

या उपक्रमास उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंधळ तसेच वनपरिक्षेत्राधिकारी संदीप जोपळे यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक कौस्तुभ वैद्य, उपमुख्याध्यापक खोमणे, पर्यवेक्षक कल्याणकर, सौ. अनिता कदम, सौ. राधिका देशपांडे तसेच एनसीसी नेव्ही ऑफिसर कैलास बागल यांची उपस्थिती होती. स्वच्छता मोहिमेत वनपाल राजाराम काशीद, उज्वला थोरात, वनरक्षक समाधान वाघमोडे, प्रकाश शिंदे, जयंत निकम यांनी सक्रिय सहभाग घेतला. संकलित कचरा एकत्र करून तो सातारा नगरपरिषद यांच्या वाहनाद्वारे कचरा डेपोत पाठवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT