Satara Crime News File Photo
सातारा

Satara Crime : कासच्या जंगलात आढळला सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह

परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : कास परिसरातील घनदाट जंगलात एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 13 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2 वाजता कास गावातील एक व्यक्ती जळणासाठी लाकूड गोळा करत असताना दाट झाडीत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह लटकताना दिसला. त्याने तात्काळ गावात जाऊन ही माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी मेढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पाहणी केली असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून कमरेखालचा भाग जंगली प्राण्यांनी विद्रूप केलेला होता, तर कमरेवरील भाग सुकलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी तपास करताना एका प्लास्टिक पिशवीमध्ये आधार कार्ड आढळून आले. त्यावरून संबंधित व्यक्तीची ओळख आनंदराव श्रीपती जिमन (मुक्काम राकुसलेवाडी, पोस्ट आसनगाव) अशी पटली. संबंधित व्यक्ती 10 ऑक्टोबर 2025 पासून बेपत्ता होती. याबाबत 13 ऑक्टोबर 2025 रोजी बोरगाव पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दि. 13 एप्रिल 2026 रोजी हा मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा घटनास्थळीच पंचनामा व शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT