Online Fraud Pudhari
सातारा

Satara News : फलटणच्या सराफाला ४२ लाखांचा ऑनलाईन गंडा

फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

फलटण : शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फलटण येथील एका सराफ व्यावसायिकाची तब्बल ४२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्थ मनीष गाधी (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फोन व व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून स्वतःला शेअर मार्केट ट्रेडिंगमधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले. तसेच एआयएफ व शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी विविध ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने बँक व्यवहार व यूपीआयद्वारे एकूण ४२ लाख रुपये संशयितांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये जमा केले.

ट्रेडिंग खात्यात मोठा नफा झाल्याचे दाखवत संशयितांनी आणखी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर मार्जिन भरणे, ट्रेडिंग पोझिशन्स रिलीज करणे आदी कारणे सांगून संशयितांनी आणखी पैशांची मागणी केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक परशराम वाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT