सातारा

Satara JCB Theft : जेसीबी चोरीप्रकरणी एकाला अटक

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली जेसीबी अवघ्या १२ तासांत हस्तगत करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड : म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली जेसीबी अवघ्या १२ तासांत हस्तगत करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले. या प्रकरणी किरण प्रल्हाद घाडगे (रा. पळशी, ता. माण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मसाईवाडी (ता. माण) येथील महावीर पांडुरंग वीरकर यांच्या मालकीची एमएच ११ सीडब्ल्यू ७३०६ क्रमांकाची जेसीबी ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री चोरीस गेली होती. जेसीबीचा चालक सागर लोखंडे (रा. दहिवड, ता. माण) याच्या घरासमोर जेसीबी उभी असताना अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली. याप्रकरणी जेसीबी मालकाने म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच म्हसवड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी किरण घाडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली जेसीबीही हस्तगत करण्यात आली. चोरीच्या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी अधिकारी संदीप पोमण, पोलीस अंमलदार अमर नारनवर, देवानंद खाडे, प्रकाश इंदलकर, विनोद सपकाळ, वसीम मुलानी आणि महिला पोलीस अंमलदार मैना हांगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT