सातारा

Satara Crime : जावली तालुक्‍यात दारू अड्ड्यावर छापे

एक्‍साईजचे धाडसत्र : सहा गावांत ८ गुन्‍हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जावली तालुक्‍यात बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी राज्य उत्‍पादन शुल्‍क (एक्‍साईज) विभागाने धाडसत्र टाकून कारवाई केल्‍या. तब्बल ८ गुन्‍हे दाखल करून सप्‍टेंबरपासून केलेल्‍या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

बिभवीत आकाश विठ्ठल आगलावे, मेढा येथे मयुरेश सुरेश गोरे, गणेश विष्णू धनावडे, सोमर्डी येथे निरंजन साहेबराव परामणे, करहर येथे संभाजी रामचंद्र गोळे, सोनगावमध्ये दिपक संजय शेवते, आनेवाडी येथे ए.एम. फरांदे यांच्यासह महिलेविरुध्द गुन्‍हा दाखल झाला आहे. सर्व संशयितांकडून देशीसह विदेशी दारु जप्‍त करण्यात आली आहे. एक्‍साईज विभागाने दि. २१ सप्‍टेंबर रोजी ही कारवाई केली आहे.

दरम्‍यान, दि. १ ते २१ सप्‍टेंबर या कालावधीत एक्‍साईज विभागाने विविध ठिकाणी छापे टाकून एकूण ४० गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत संशयित आरोपींच्या ताब्यातून देशी, विदेशी दारु, बिअर, ताडी, दुचाकी वाहने असा एकूण २ लाख ३८ हजार १० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. दरम्‍यान, यापुढेही जावली तालुक्यामध्ये अवैध मद्यविक्री होत असल्याचे आढळून आल्‍यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, राजेश कोळी, दुय्यम निरीक्षक विजय मरोड, अमित जगताप, निता पाटील, नितीन जाधव, अजित रसाळ, रमेश भुजबळ, जीवन शिर्के, उदयसिंह जाधव, विनोद हिंगणे, अमित क्षीरसागर, बाळासाहेब पाचुंदे, किरण जंगम, मुल्ला यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT