prostitution racket Pudhari File Photo
सातारा

Satara crime: जाधववाडीतील ऑरेंज लॉजवर छापा; वेश्या व्यवसाय प्रकरणी एकाला अटक व कोठडी

जाधववाडी, ता. फलटण येथील ऑरेंज लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एकाला अटक केली

पुढारी वृत्तसेवा

फलटण : जाधववाडी, ता. फलटण येथील ऑरेंज लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून संशयिताला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रवीण रामचंद्र दडस (वय 26, रा. टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील ऑरेंज लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. छाप्यात एका महिलेच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रवीण दडस याच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दि. 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात महिला पोलिस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, पोलिस अंमलदार सचिन भोसले, नितीन सजगणे, बापुराव धायगुडे, दत्तात्रय नाळे, दत्तात्रय लवटे, गणेश अवघडे, निखिल गायकवाड आदींचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT