सातारा : जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी सातार्यातीलच एका हॉटेलवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचे पत्र आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत तपास केला असता संशयित फलटण तालुक्यातील असल्याचे समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरानजीक महार्गावरील हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी एक पत्र आले. ते पत्र पाहून हॉटेलमध्ये कल्ला उडाला. सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. दुसरीकडे पोलिसांनी संबंधित पत्राचा तपास करण्यास सुरुवात केली. पोस्ट ऑफिसच्या सहाय्याने ते पत्र कुठून आले? याचा शोध घेण्यात आला. त्यानुसार फलटण येथून आल्याचे समोर आल्यानंतर संबंधित एक संशयास्पद व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये दिसून आली.
पोलिसांनी तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संशयित व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली. दुसरीकडे हॉटेलमध्ये सर्वत्र पाहणी केल्यानंतर कुठेही आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत संशयास्पद वाटणार्या सर्व बाबींची खातरजमा केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आणखी हाॅटेललादेखील लेटर पाठवली?
शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाला गती दिली आहे. संशयिताने मुंबईतील आणखी काही हॉटेललादेखील अशा प्रकारची लेटर पाठवली आहेत का? याचा तपास केला जात आहे. हे पत्र मंगळवारी मिळाले असून, इतर पत्रे आणखी पोस्ट ऑफिसच्या प्रक्रियेत आहेत.