सातारा

Satara : हरिपूर ठरले 100 टक्के स्वगणना करणारे खंडाळा तालुक्यातील पहिले गाव

खंडाळा तालुक्यातील हरिपूर हे गाव जनगणना 2027 अंतर्गत स्व गणना पूर्ण करणारे खंडाळा तालुक्यातील पहिले गाव व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव ठरले

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील हरिपूर हे गाव जनगणना 2027 अंतर्गत स्व गणना पूर्ण करणारे खंडाळा तालुक्यातील पहिले गाव व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव ठरले आहे. गावातील एकूण 112 कुटुंबांनी ऑनलाईन स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. हरिपूर गावचे सुपुत्र व आदर्श डिजिटल ग्राम हरिपूरचे मार्गदर्शक हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने या गावाने स्वगणना 100 टक्के पूर्ण करत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

या उल्लेखनीय कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्या हस्ते गावचे सरपंच, अंगणवाडी सेविका तसेच प्रगणकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनगणना मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच प्रत्यक्ष होणाऱ्या जनगणनेत ही प्रगणक यांना जनगणना लवकर पूर्ण करणे याबाबत गावचे पूर्ण सहकार्य राहील, असे नागरिकांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना हेमंत कामत यांनी डिजिटल जनगणना प्रक्रियेत हरिपूर गावाने दाखवलेली तत्परता आणि लोकसहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच इतर गावांनीही हरिपूरच्या आदर्शाचा प्रेरणादायी नमुना म्हणून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तहसील कार्यालयाचे महसूल नायब तहसीलदार रविराज जाधव यांनी स्वगणना म्हणजे डिजिटल जनगणनेत स्वतःची जनगणना नोंदणी स्वतः करण्याची सुविधा ही 1 ते 15 मे 2026 नागरिकांनी स्वतः कुटुंबाची गणना https://se.census.gov.in/submission-success ॲपद्वारे करणेबाबतची माहिती दिली.

यावेळी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी प्रफुल्ल बाबर, सरपंच संदीप भिलारे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव मोरे, माजी सरपंच शंकर पाटणे, उपसरपंच विजयाताई भिलारे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मुरलीधर पाटणे, ग्रामसेवक कुदळे, यशवंत भिलारे, सोसायटीचे संचालक दादा मोरे, मोहन पाटणे, अंगणवाडी सेविका उत्कर्षा पवार, अंगणवाडी मदतनीस रूपाली मोरे, ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा मोरे, आशा सेविका मनीषा भिलारे, जनगणना प्रगणक अरविंद सोनवणे, आदी नागरिक उपस्थित होते. गावाने घेतलेल्या या परिश्रमाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही हरिपूरचे मार्गदर्शक हरिश पाटणे आणि हरिपूरच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT