Koyna Dam  Pudhari Photo
सातारा

Koyna Dam: उन्हाळ्यात सिंचन,वीज निर्मितीची चिंता नाही

कोयना धरणात जलवर्षाच्या अंतिम मे महिन्यासाठी 33 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पुढारी वृत्तसेवा
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जल वर्षापैकी अकरा महिन्यांचा कालावधी संपला आहे. दाहीदिशा कडक उन्हाळा असतानाही धरण जल वर्षाच्या तांत्रिक अंतिम मे या एका महिन्यांसाठी धरणात सध्या 33.17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. अकरा महिन्यांत 186.83 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

एक जून नवीन जल वर्षारंभाला 23.12 टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाला सुरुवात झाली होती. अकरा महिन्यात धरणातून पश्चिम वीजनिर्मितीसाठी.80, सिंचनासाठी 27.91, पुरकाळातील 14.53 अशा 99.12 टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती करून व ऐनवेळी सिंचनाची अतिरिक्त गरज भागविण्यासाठी धरण पायथ्याशी असलेल्या आपत्कालीन विमोचक दरवाजातून 3.64 टीएमसी तर 64.67 टीएमसी पाणी विनावापर व 7.79 टीएमसी बाष्पीभवन असे 72.46 टीएमसी अशा एकूण 175.22 टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात 33.17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने सध्या सिंचनासह वीजनिर्मितीची चिंता नाही.

सिंचनासाठी आत्तापर्यंत 27.91 टीएमसी पाणीवापर झाला आहे. वर्षभरात पश्चिम वीजनिर्मितीसाठी लवादाचा 67.50 टीएमसी पाणीकोटा आरक्षित असतो. त्यापैकी आतापर्यंत 57.80 टीएमसी पाणीवापर झाल्याने आगामी ऐन उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी असतानाच्या मे महिन्यासाठी 9.70 टीएमसी पश्चिम वीजनिर्मितीसाठीच्या कोटयाचे आरक्षीत पाणी शिल्लक आहे. सध्या धरणात उपलब्ध पाणीसाठा 33.17 असून त्यापैकी उपयुक्त साठा 28.05 टीएमसी इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT