सणबूर : पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारती, अंतर्गत रस्ते व स्मशानभूमी शेड, निवारा शेड इत्यादी कामांना जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील १० नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारती, २० गावांतील अंतर्गत रस्ते तसेच ४१ गावांतील स्मशानभूमी शेड, निवारा शेड इत्यादी कामांसाठी ६ कोटी ३४ रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजने अंतर्गत नवीन ग्रामपंचातय कार्यालय इमारतींमध्ये चौगुलेवाडी आचरेवाडी १५ लाख, नाणेगाव बुद्रुक १५ लाख, मरळोली १५ लाख, आटोली १५ लाख, चोपदारवाडी १५ लाख, पाडेकरवाडी १५ लाख, चिटेघर १५ लाख, आसवलेवाडी १५ लाख, पेठशिवापूर २० लाख, अंबवडे खुर्द १५ लाख अशी एकूण १ कोटी ५५ लाख निधी मंजूर झाला आहे.
तर जनसुविधा योजना अंतर्गत रस्ते वाझोली मातंगवस्ती अंतर्गत रस्ता ४ लाख, धनगरवस्ती घाणबी अंतर्गत रस्ता २० लाख, झाकडे सुतारवस्ती रस्ता सुधारणा २० लाख, कुठरे अंतर्गत रस्ता सुधारणा २० लाख, कळकेवाडी (कुसरुंड) अंतर्गत रस्ता सुधारणा २० लाख, दिक्षी अंतर्गत रस्ता सुधारणा १० लाख, कवरवाडी पिंपळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा २० लाख, बोडकेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा १० लाख, विहे जुने गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा ०५ लाख, मरळी कोळीवस्ती व मातंगवस्ती रस्ता सुधारणा २० लाख, मणदुरे मातंगवस्ती रस्ता सुधारणा १५ लाख, येरफळे अंतर्गत रस्ता सुधारणा २० लाख, गुजरवाडी म्हावशी अंतर्गत रस्ता सुधारणा १५ लाख, गोषटवाडी बावधने वस्ती रस्ता सुधारणा १५ लाख, करपेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा२० लाख, वजरोशी पडसाळ रस्ता सुधारणा १५ लाख, बाचोली अंतर्गत रस्ता सुधारणा २० लाख, आरेवाडी ता.कराड अंतर्गत रस्ता सुधारणा १० लाख, आरेवाडी अंतर्गत आरसीसी गटर १० लाख, सुपने इंदूबाई पाटील विहिर ते पानुगडे वस्ती ते माळी वस्ती रस्ता सुधारणा १० लाख या २० गावांतील अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे.
सुपुगडेवाडी येथे स्मशानभूमी शेड ४ लाख, कळकेवाडी (कुसरुंड) स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, गुरेघर पुनर्वसन धावडे मागासवर्गीय वस्ती स्मशानभूमी शेड ४ लाख, आडदेव वरचे स्मशानभुमी शेड ४ लाख, बनपूरी येथे मातंगवस्ती स्मशानभूमी शेड ४ लाख, गव्हाणवाडी स्मशानभूमी सुधारणा ४ लाख, केरळ बौध्दवस्ती स्मशानभूमी शेड ४ लाख, डोणीचावाडा वांझोळे येथे स्मशानभूमी शेड ४ लाख, वाझोली येथे स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, कुठरे स्मशानभूमी सुधारणा १० लाख, पवारवाडी कुठरे स्मशानभूमी सुधारणा १० लाख, चौगुलेवाडी काळगाव सावंतवाडी स्मशानभूमी व निवारा शेड ८ लाख, कुंभारगाव पाटीलवाडी मुळगावकरवस्ती स्मशानभूमी शेड ४ लाख, गुढेकरवाडी खळे स्मशानभूमी सुधारणा ४ लाख, दिंडेवाडी गुढे स्मशानभूमी शेड ४ लाख, काढोली स्मशानभूमी शेड ४ लाख, रासाटी येथे स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, सुर्याचीवाडी नाणेगाव बुद्रुक स्मशानभूमी शेड ४ लाख, बाहे पाचगणी स्मशानभूमी शेड ४ लाख, चोपदारवाडी येथे स्मशानभूमी व निवारा शेड ८ लाख, बामणेवाडी येथे स्मशानभूमी शेड ४ लाख, कराटे स्मशानभूमी शेड ४ लक्ष, घाणव येथे स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख,
जोतिबाचीवाडी येराड स्मशानभूमी शेड ४ लाख, आरल निवकणे स्मशानभूमी शेड ४ लाख, घराळवाडी नंबर २ स्मशानभूमी शेड ४ लाख, कुंभारगाव स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, खांडेकरवाडी गोषटवाडी स्मशानभूमी ४ लाख, जाळगेवाडी स्मशानभूमी ४ लाख, संभाजीनगर वेखंडवाडी स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, वजरोशी मुस्लिम समाज दफनभूमी ४ लाख, तारळे मातंगवस्ती स्मशानभमी शेड ४ लाख, चोपडी मागासवर्गीय वस्ती स्मशानभूमी शेड ४ लाख, म्हाळुंगेवाडी सातर येथे स्मशानभूमी शेड ४ लाख, कळंबे स्मशानभूमी शेड ४ लाख, विठ्ठलवाडी शिरळ येथे स्मशानभूमी शेड ४ लाख, कारवट येथे स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, डेळेवाडी येथे स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, तांबवे येथे स्मशानभूमी निवारा शेड ४ लाख, म्होप्रे मुस्लिम समाज दफनभूमी सुधारणा ४ लाख अशा ४१ गावांतील स्मशानभूमींचे कामांना निधी मंजूर झाला आहे.