Crime Pudhari
सातारा

Satara Crime: एकसर पार्टेवाडीत चोरट्यांची वृद्ध दाम्पत्याला मारहाण; ऐवज लंपास

एकसर, पार्टेवाडी (ता. वाइर्) येथे तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चौघा चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन सुमारे 1 लाख 55 हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास केला

पुढारी वृत्तसेवा

वाई : एकसर, पार्टेवाडी (ता. वाइर्) येथे तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चौघा चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन सुमारे 1 लाख 55 हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वाई पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

एकसर पार्टेेवाडी येथील शिवाजी देशमुख व त्यांची पत्नी सुमन देशमुख हे दोघे घराच्या पडवीत झोपले असता पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चौघा चोरट्यांनी कपाटांची उचकपाचक करत सोने आणि रोकड शोधण्यास सुरुवात केली. यावेळी सुमन देशमुख यांनी उशाजवळ ठेवलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरट्यांच्या नजरेस पडले. त्यातील एका चोरट्याने ते हिसकावून घेतले. तसेच सोन्याची फुले खेचण्याचाही प्रयत्न केला; मात्र ती खाली पडल्याने चोरट्यांना ती घेऊन जाता आली नाहीत.

शिवाजी देशमुख यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दांडक्याने मारहाण केली. सुट्टीसाठी गावी आलेला त्यांचा नातू पंकज देशमुख हा बेडरूममध्ये झोपला होता. त्याला आवाज आल्याने त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना दरवाजा बाहेरुन बंद केला होता. खिडकीतून पाहिले असता चारही चोरटे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT