Crime News pudhari photo
सातारा

Satara gelatin case: जिलेटिनप्रकरणी एकाला अटक, कोठडी

संशयित राजस्‍थानचा; इतर साथीदारांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरानजीक जिलेटिनच्या कांड्या, अमोनियम नायट्रेट व डिटोनेटरचा साठा सापडल्‍याप्रकरणी एकाला अटक करून न्‍यायालयात हजर करण्यात आले. त्‍याला पोलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. संशयित मूळचा राजस्‍थान राज्यातील असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

शिवराज बलदेव चौधरी (वय ५०, सध्या रा. खिंडवाडी, ता. सातारा, मूळ रा. भिलवाडा, राजस्‍थान) असे कोठडी मिळालेल्‍या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे फौजदार सुधीर मोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बुधवारी सायंकाळी सातारा शहर व तालुका पोलिसांना जिलेटिन साठ्याची माहिती मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्‍थळी धाव घेतली.

यावेळी बंद असलेल्‍या कंटेनरमध्ये ज्वालाग्राही साठा पोलिसांना सापडला. पोलिसांनी घटनास्‍थळ सील करून तपासणी केली. यामध्ये अमोनियम नायट्रेटची ५० किलो वजनाची १० पोती, सुपरपॉवर ९० व डेंजर एक्‍सप्‍लोझिव्‍ह असे लिहिलेेले १० पॅकबंद बॉक्‍स. या प्रत्‍येक बॉक्‍समध्ये २०० जिलेटिन कांड्या अशा २००० जिलेटिन कांड्या याशिवाय इतर अनेक साहित्‍य सापडले. पोलिसांनी ही सर्व पाहणी करताना बीडीडीएस व फॉरेन्‍सिक पथक तैनात केले होते. सर्व मुद्देमालाचा पंचनामा करून तो जप्‍त केला. जप्‍त केलेला मुद्देमाल अधिकृत विक्रेता असलेल्‍या व परवानाधारकाकडे ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT