सातारा

Satara Ganeshotsav : गणपती मिरवणुकीत बीम लाईटचा वापर; दोन मंडळांवर गुन्हे

गणपती आगमन मिरवणुकीत बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे गणपती आगमन मिरवणुकीत बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिस अधीक्षक, सातारा यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी लेझर व बीम लाईटच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच मेढा पोलिसांकडून संबंधित गणेश मंडळांना बीम लाईटचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावरूनच मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व कुडाळ पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार निकम यांनी याबाबत बंदोबस्तामध्ये सदर मिरवणुकीत डीजे आणि लेसर लाईट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई केली आणि संबंधित डीजेच्या गाड्या देखील जप्त केल्या.

१४ सप्टेंबर रोजी रात्री कुडाळ बाजारपेठ ते पीयूष चौक या मार्गावर गणपती आगमन मिरवणूक सुरू असताना बीम लाईटचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी श्री गणेश मित्र मंडळ, कुडाळ आणि राजमुद्रा गणेश मंडळ, कुडाळ या दोन मंडळांवर कारवाई करण्यात आली. श्री गणेश मित्र मंडळाच्या प्रकरणात विरा लाईटस्‌, पुसेगावचे तेजस भिमराव येवले यांच्याविरुद्ध, तर राजमुद्रा गणेश मंडळप्रकरणी ए. एस. लाईटस्‌, पुसेगावचे निहाल नवनाथ लेंबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT