Gambling Raid Pudhari Photo
सातारा

Satara Gambling Raids : सातार्‍यात जुगार अड्ड्यांवर छापे; पोलिसांची ३ ठिकाणी कारवाई

चक्रीचाही पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून ३ ठिकाणी कारवाई केली. मल्‍हार पेठेत चोरी छुपके चालणारा चक्री जुगार अड्ड्याचाही पोलिसांनी पर्दाफाश केला. सातार्‍यातील मल्‍हार पेठ येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणारा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. याप्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

अनिकेत माणिक शिंदे (वय २६, रा. मल्‍हार पेठ, सातारा), सौरभ उर्फ कुक्‍या कैलास खरात (रा. मल्‍हार पेठ, सातारा), मोहम्‍मद अली मुल्‍ला (रा. शनिवार पेठ, सातारा), ओमकार नारायण कांबळे (वय २७, रा. मल्‍हार पेठ, सातारा) यांच्या विरुध्‍द गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस विक्रम माने यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पोलिसांनी दि. २३ सप्‍टेंबर रोजी मल्‍हार पेठ येथे ही कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून घटनास्‍थळावरुन जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले.

जुगार प्रकरणी दुसरी कारवाई परशुराम वामन पवार (वय २६, रा. सदरबझार, सातारा) याच्या विरुध्द करण्यात आली आहे. त्‍याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून ६३० रुपये व जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले आहे. ही कारवाई सदरबझार येथील सार्वजनिक शौचालय परिसरात केली आहे. मोळाचा ओढा, सातारा येथे जुगार प्रकरणी एलसीबीने तिसरी कारवाई सतिश कृष्णा शिंदे (वय ४६, रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर केली आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून २८५२ रुपये व जुगाराचे सहित्‍य जप्‍त केले. संशयित हा अनिल भिुक मिठापुरे याच्यासाठी जुगार घेत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT