सातारा

Satara Crime: बनावट दागिने विकणारी महिला ताब्यात; एक पसार

नागठाणेतील दोन ज्वेलर्सना गंडा घालण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) येथे बनावट चांदीचे दागिने विकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला दुकानदाराच्या सतर्कतेमुळे बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित महिलेसह आणखी एका पसार महिलेवर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल केला आहे. नफिसा बानू अन्सारी (रा. डोराई रोड, बेगून, जि. चित्तोडगड, राजस्थान) असे संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अजित विलास ताटे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे.

सोमवारी दुपारी नफिसा ही नागठाणे येथील चौंडेश्वरी ज्वेलर्समध्ये सुमारे १९७ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण मोडीत विकण्यासाठी आली होती. दागिन्यांची तपासणी करताना ते बनावट असल्याचे दुकानदार अजित ताटे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बोरगाव पोलिसांना याची माहिती दिली.

याचवेळी तिच्या साथीदार महिलेने शेजारील अनिल घाडगे यांच्या ज्वेलर्समध्ये ९८ ग्रॅम वजनाचे बनावट पैंजण मोडीत देऊन सुमारे ९ हजार रुपये घेतले आणि तेथून पसार झाली. याची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नफिसा हिला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT