सातारा

Satara Accident : ईव्हीएम असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात

वाहनाचे मोठे नुकसान; चालक किरकोळ जखमी

पुढारी वृत्तसेवा

सिद्धेश्वर कुरोली : खटाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास निमसोड मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन व निवडणूक कर्मचारी आणण्यासाठी जात असलेल्या कृषी विभागाच्या शासकीय वाहनाचा अपघात झाला.

कृषी विभागाची चारचाकी गाडी (क्रमांक एम.एच. 11 ए.बी. 212) निमसोड होळीचा गाव रस्त्यावरून जात असताना चालक तुकाराम खाडे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची अद्याप पोलिस ठाण्यात नोंद झालेेली नव्हती. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून वडूज तहसील कार्यालय परिसरात उभे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT