Satara Accident Pudhari
सातारा

Satara Accident: कालव्यात आयशर टेम्पो कोसळला

पाटखळ, ता.सातारा गावच्या हद्दीतील कण्हेर डावा कालव्यामध्ये गुरुवारी पहाटे आयशर टेम्पो कोसळला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पाटखळ, ता.सातारा गावच्या हद्दीतील कण्हेर डावा कालव्यामध्ये गुरुवारी पहाटे आयशर टेम्पो कोसळला. या घटनेने परिसर हादरुन गेल्यानंतर तात्काळ बचावासाठी काही ग्रामस्थांनी धाव घेतली. या थरारक घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, आयशर टेम्पो पाटखळ गावच्या हद्दीतून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट पाणी असलेल्या कालव्यात गेला. क्षणात घडलेल्या या घटनेनंतर चालक व क्लिनर यांनी सावधानता बाळगत स्वत:चा बचाव केला. पहाटे घडलेल्या या थरारक घटनेनंतर परिसरातील काही ग्रामस्थ जमा झाले. पाहता पाहता बघ्यांची गर्दी झाली. अपघातानंतर क्रेन बोलवण्यात आली आणि अपघातग्रस्त वाहन कालव्यातून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, रात्री उशीरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT