Dr. Smita Yogesh Jadhav  
सातारा

Dr. Smita Jadhav| डॉ. स्मिता जाधव यांच्यासाठी संघटना एकवटल्या

उत्स्फूर्त पाठिंबा देत व्यक्त केला विजयाचा निर्धार : प्रचाराचा झंझावात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचाराचा सातारा जिल्ह्यात जोरदार धडाका सुरू असून, शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्था, संघटना आणि असोसिएशन यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, पदवीधर संघटना आणि विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या प्रचाराला बळ मिळत असून, या संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय झाले आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्यात सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. उच्च विद्याविभूषित आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. स्मिता जाधव यांनी दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यात जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत पदवीधर, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील संस्था चालक व प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादातून त्यांनी आपली उमेदवारी व शैक्षणिक क्षेत्राबाबतची भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेला प्रतिसाद मिळत असून, विविध संस्था आणि संघटनांकडून पाठिंब्याचा ओघ वाढला आहे.

डॉ. स्मिता जाधव यांच्यासाठी या संघटना आता मैदानात उतरल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, गौरीशंकर एज्येकशनल ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्ट, समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट, रावसाहेब वांगडे मास्टर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिरिंग ॲण्ड टेक्नालाॅजी सातारा, शाहूपुरी माध्यमिक विद्यालय, महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, यासह विविध शासकीय कर्मचारी, असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

सातारा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाठिंब्यामुळे डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचाराला बळ मिळाले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रचाराला व्यापक स्वरूप आले आहे. यशोदा संस्थेतील सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी रान उठवले आहे. गौरीशंकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टने डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा दर्शवताना सक्रिय सहभाग देण्याची ग्वाही दिली आहे. या संस्थेतील सर्वच कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा निर्धार केला आहे.

समर्थ एज्युकेशनल ट्रस्टनेही डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयानेही डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा दिला आहे. पाटखळ (ता. सातारा) येथे श्री वडजाई देवी शैक्षणिक ट्रस्टने पाठिंब्याचे पत्रक काढले आहे.

शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग व पाठिंबा पदवीधर मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या माध्यमातून शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास या विविध संस्था व संघटनांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT