सातारा : सातार्यातील सदरबझार परिसरामध्ये काही महिन्यापासून ड्रग्ज इंजेक्शन आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी 5 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणाची मुंबईपर्यंत लिंक गेली असून तेथील एकाला अटक करण्यात आली आहे.
शिवराज पंकज कणसे (वय 24, गोडोली, सातारा), साईकुमार महादेव बनसोडे (वय 25, रा. भोसे ता. पंढरपूर जि. सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (वय 19, रा. कोयना सोसायटी, सदरबझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय 20, रा. झेड.पी. कॉलनी, शाहूपुरी, सातारा), तय्यब हाफीस खान (वय 23, रा. बांगूरनगर, गोरेगाव, मुंबई) अशी अटक केलेल्या टोळीची नावे आहेत. सातार्यात नशेसाठी इंजेक्शन वापरली जात असल्याने गेल्या दोन महिन्यापासून सातारा शहर पोलिस लक्ष ठेवून होते.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि श्याम काळे, फौजदार डी.एस. देवकर, सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.