कोडोली : मेळाव्‍यात बोलताना डॉ. प्रिया शिंदे, त्‍यावेळी डॉ. स्‍मिता जाधव, सुनेशा शहा, वासंती माने, स्‍वाती माने, मनिषा पांडे, हेमलता भोसले व मान्‍यवर.  
सातारा

Priya Shinde : डॉ. स्‍मिता जाधव यांच्‍याकडे व्‍यापक व्‍हिजन

डॉ. प्रिया शिंदे : उच्चांकी मतदानासाठी ताकदीने प्रयत्न करा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे व्यापक व्हिजन असून, भाजपने एका सक्षम महिलेला पदवीधर मतदारसंघातून संधी दिली आहे. डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.

कोडोली येथील जानाई-मळाई शिक्षण संस्थेत आयोजित मतदार संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पदवीधर मतदारसंघातील भाजपच्‍या उमेदवार डॉ. स्‍मिता जाधव, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुनेशा शहा, नगरसेविका हेमलता भोसले, सुनील माने, स्वाती माने, वासंती माने, राजू माने, भरत मुळे, मनीषा पांडे, तेजस्विनी दुर्गे उपस्थित होते.

डॉ. प्रिया शिंदे म्‍हणाल्‍या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारताची वाटचाल जागतिक महासत्तेकडे सुरु आहे. अशावेळी काही परकीय शक्तींकडून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत जनतेने सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. डॉ. स्मिता जाधव यांनी आपल्या प्रचारात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.

डॉ. स्‍मिता जाधव म्‍हणाल्‍या, कौशल्यप्राप्त युवक-युवतींना उद्योगजगतात मोठी मागणी असून, आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यानंतर रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील ५८ तालुक्यांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याचा माझा मानस आहे. स्थानिक पातळीवरच युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रत्येक तालुक्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करणार आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात देवीने मला आत्मविश्वासाने काम करण्याची आणि निर्भयपणे संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा दिली आहे. महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी मिळवून देणे, अशा विविध संकल्पना आपण मांडल्या आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जनतेला दिलेली ही वचने आमदार झाल्यानंतर निश्चितपणे पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आ. महेश शिंदे यांचा संदेश...

पदवीधरांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी डॉ. स्‍मिता जाधव यांच्‍या पाठीशी ठाम उभे राहण्‍याचा संदेश आ. महेश शिंदे यांनी दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. प्रिया शिंदे यांनी या कार्यक्रमात केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT