Satara District Bank  
सातारा

Satara District Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ ठराव रद्द

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदानाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. कच्च्या मतदार यादीतील २,०२७ मतदारांपैकी आठ ठराव रद्द झाल्याने अंतिम यादीत २,०१९ मतदार राहिले आहेत. महाबळेश्वर, माण, फलटण व कोरेगाव सोसायटी मतदारसंघातील प्रत्येकी एक ठराव रद्द झाला आहे. तसेच खरेदी-विक्री संघ, नागरी बँका-पतसंस्था मतदारसंघातील प्रत्येकी एक आणि गृहनिर्माण मतदारसंघातील दोन ठराव रद्द झाले आहेत.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकीय गणित आता अधिक स्पष्ट झाले आहे. विद्यमान संचालकांसह इच्छुक उमेदवारांनी सोसायटीसह अन्य मतदारसंघांतून आपापले ठराव करून ठेवले आहेत. अंतिम यादीत नाव निश्चित झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आता उमेदवारीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

सोसायटी मतदारसंघातील चार, खरेदी-विक्री संघातील एक, नागरी बँका-पतसंस्था मतदारसंघातील एक आणि गृहनिर्माण व दूध संस्था मतदारसंघातील दोन ठराव रद्द झाले आहेत. कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघात कोणताही ठराव रद्द झालेला नाही. अशा प्रकारे एकूण आठ ठराव अंतिम यादीतून वगळली आहेत.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे २४ किंवा २५ सप्टेंबरदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्ज दाखल करणे, छाननी, माघार आणि अंतिम उमेदवार यादी या टप्प्यांना सुरुवात होईल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता ­­­­­ आहे.

राजकीय हालचालींना वेग...

अंतिम मतदार यादी निश्चित झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे. भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांकडूनही सर्वपक्षीय समीकरणांची चाचपणी सुरू आहे. मतदारसंघनिहाय उमेदवार निश्चित करण्याबरोबरच कोणाला संधी द्यायची, कोणाला थांबवायचे आणि कोणत्या गटाची मते निर्णायक ठरू शकतात, याची गणिते मांडली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT