सातारा जिल्‍हा बँक 
सातारा

Satara News : जिल्हा बँकेसाठी ७४ अर्ज दाखल

चार दिवसांत ४४१ अर्जांची विक्री; उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा बँकेच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी १४ उमेदवारांनी १५ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकूण ७४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. चार दिवसांत सुमारे ४४१ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसांत ४९ उमेदवारांनी ५९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यामध्ये बुधवारी आणखी १४ उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केल्याने दाखल नामनिर्देशनपत्रांची संख्या ७४ वर पोहोचली आहे.

बुधवारी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष कराड तालुका मतदारसंघातून उदयसिंह पाटील, खंडाळा तालुका मतदारसंघातून राजेंद्र नेवसे, तर माण तालुका मतदारसंघातून मनोजकुमार पोळ यांनी दोन अर्ज दाखल केले. गृह निर्माण व दूध संस्था मतदारसंघातून ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज दाखल केला. विजाभज राखीव प्रवर्गातून अशोक काकडे, दिनकर शिरतोडे व शकुंतला साबळे यांनी अर्ज दाखल केले. इतर मागास वर्ग राखीव प्रवर्गातून सुभाष नरळे यांनी अर्ज दाखल केले.

नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकऱ्यांच्या पतसंस्था मतदारसंघातून राजेश पाटील व मनोजकुमार पोळ यांनी अर्ज दाखल केले. महिला राखीव प्रवर्गातून सौ. ऋतुजा राजेश पाटील व सौ. पुष्पा धनंजय पवार यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून रवींद्र बडेकर, तर कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले यांनी अर्ज दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT