Satara District Bank  
सातारा

Satara District Bank : दिवाळीपूर्वीच फुटणार जिल्हा बँकेचे फटाके

२५ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २१ संचालक पदांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या निर्णय अधिकारीपदी जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांची निवड केली आहे.

हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादीत २०१९ मतदार निश्‍चित झाले आहेत. मतदार निश्‍चित झाल्‍याने २५ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रम लागण्‍याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच बँकेची निवडणूक होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे दिवाळीपूर्वीच डीसीसीचे फटाके फुटणार आहेत.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, विद्यमान संचालक आणि विविध गटांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. उमेदवारी निश्‍चितीपासून पॅनेलची बांधणी आणि मतदारसंघनिहाय गणित जुळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बँकेवरील पारंपरिक सहकारातील समीकरणे बदलण्याच्या उद्देशाने भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर झाली आहे. ना. जयकुमार गोरे यांनीही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे भाजपच्या पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT