Shivendraraje Bhosale| साताऱ्याच्या विकासाची धमक फक्त भाजपमध्येच : ना. शिवेंद्रराजे भोसले Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale| साताऱ्याच्या विकासाची धमक फक्त भाजपमध्येच : ना. शिवेंद्रराजे भोसले

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहराचा विकास करणे आणि नागरिकांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवणे, यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. सातारा शहरात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची सर्व प्रकारची कामे केली आहेत. अनेक विकासकामे सुरु आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी काँक्रिटीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. शहराच्या विकासाची धमक फक्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे सातारकरांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना भक्कम साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

सातारा नगरपालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमोल मोहिते व भाजप नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी झालेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी अमोल मोहिते व पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह सर्व आजी - माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा शहरातील मतदार सुज्ञ आहेत. त्यांना कोण काम करतं, हे चांगलं माहीत आहे. होत असलेली कामे सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. मी स्वत: जनतेसाठी 24 तास उपलब्ध असतो. सातारकर नागरिकांचे सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे आणि मी, दोघेही नेहमीच प्राधान्य देतो. निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया आहे. सातारकर नेहमीच आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. त्यांना काहीही कमी पडू द्यायचे नाही, ही जबाबदारी आमची आहे. ती पार पाडण्यात कधीही कुचराई होणार नाही. आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते सर्वांना घेवून पुढे जाणारे नेतृत्व आहे. या सुसंस्कृत नेतृत्वाला सातारकर भरभक्कम साथ देतील, यात मला तिळमात्र शंका नाही. हा विश्वास सार्थकी लावा, असे आवाहनही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

अमोल मोहिते म्हणाले, ‌‘सातारकरांसाठी काय पण‌’ ही माझी भुमिका आहे. शहराच्या विकास कामात व लोकांना नागरी सुविधा देण्यासाठी मी कायम कटिबध्द आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शहर विकासाचे नवनवे टप्पे पार करत आहे.

विकासकामात कमी पडणार नाही : अमोल मोहिते

अमोल मोहिते यांनी सातारकरांचा विकास, हाच माझा ध्यास असल्याचे सांगितले. ते म्हणाले, निवडणूक ही येत-जात असते. मात्र माझ्या सातारकरांना हव्या असणाऱ्या सुविधा देणे, बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत राहणे, ही माझ्या कामाची पद्धत आहे. काम करत असताना मी कधीही अन्‌‍ कसलाही दुजाभाव करत नाही, करणारही नाही. नागरिकांना सुविधांबरोबरच अनेकदा काही समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्या सोडवणे ही जबाबदारीही मी पार पाडत असतो. लोकांच्या अडचणीला धावून जाणे, हे माझ्या स्वभावातच आहे. तुम्ही मला संधी द्या, मी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्दही अमोल मोहिते यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT