सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत चालली आहे. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील धरणात केवळ ३५.८८ टक्केच पाणीसाठा आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिली आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. कोयना धरणात आजची पाणी पातळी ६२१.६१ मीटर असून आजचा पाणीसाठा १३.९७० टीएमसी आहे. ८.८४ टक्के धरणात पाणीसाठा आहे. धोम धरणात आजची पाणी पातळी ७३१.७१ मीटर असून आजचा पाणीसाठा ३.७८० टीएमसी आहे. १६.८५ टक्के धरणात पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात आजची पाणी पातळी ७८२.२० मीटर असून आजचा पाणीसाठा ०.६८० टीएमसी आहे. १४.१४ टक्के धरणात पाणीसाठा आहे.
कण्हेर धरणात आजची पाणी पातळी ६७६.९५ मीटर असून आजचा पाणीसाठा ३.३६० टीएमसी आहे. २९.८२ टक्के धरणात पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात आजची पाणी पातळी ६८०.६८ मीटर असून आजचा पाणीसाठा ३.१३० टीएमसी आहे. २९.२२ टक्के धरणात पाणीसाठा आहे. तारळी धरणात आजची पाणी पातळी ६७१.४२ मीटर असून आजचा पाणीसाठा ०.६९० टीएमसी आहे. ११.६४ टक्के धरणात पाणीसाठा आहे.
मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी धरणात आजची पाणी पातळी ६९४.१९ मीटर असून आजचा पाणीसाठा ०.४४० टीएमसी आहे. नेर धरणात आजची पाणी पातळी ८११.६८ मीटर असून आजचा पाणीसाठा ०.२४० टीएमसी आहे. ५७.६९ टक्के धरणात पाणीसाठा आहे. राणंद धरणात आजची पाणी पातळी ६६४.८८ मीटर असून आजचा पाणीसाठा ००.५९ टीएमसी आहे. १५.४९ टक्के धरणात पाणीसाठा आहे. आंधळी धरणात आजची पाणी पातळी १०५.७० मीटर असून आजचा पाणीसाठा ०.२०४ टीएमसी आहे. ५३.०५ टक्के धरणात पाणीसाठा आहे.
नागेवाडी धरणात आजची पाणी पातळी ८३६.९५ मीटर असून आजचा पाणीसाठा ०.०६७ टीएमसी आहे. २२.६० टक्के धरणात पाणीसाठा आहे. मोरणा धरणात आजची पाणी पातळी ६५५.४० मीटर असून आजचा पाणीसाठा ०.८९६ टीएमसी आहे. ६२.०० टक्के धरणात पाणीसाठा आहे. उत्तरमांड धरणात आजची पाणी पातळी ६७७.२५ मीटर असून आजचा पाणीसाठा ०.२८६ टीएमसी आहे. ३१.८६ टक्के धरणात पाणीसाठा आहे. महू धरणात आजची पाणी पातळी ८५४.१० मीटर असून आजचा पाणीसाठा ०.७०४ टीएमसी आहे. ६३.९४ टक्के धरणात पाणीसाठा आहे. हातगेघर धरणात आजची पाणी पातळी ८२४.६० मीटर असून आजचा पाणीसाठा ०.०७५ टीएमसी आहे. २८.८० टक्के धरणात पाणीसाठा आहे. वांग मराठवाडी धरणात आजची पाणी पातळी ६३६.७० मीटर असून आजचा पाणीसाठा ०.५७७ टीएमसी आहे. २०.९२ टक्के धरणात पाणीसाठा आहे.