illegal liquor seized pudhari photo
सातारा

Dahivadi illegal liquor: दहिवडीत पुन्हा अवैध दारूवर कारवाई; मद्यासह वाहन जप्त

कारवाईत वाहनासह एकूण 2 लाख 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

दहिवडी : दहिवडी पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत दहिवडी-गोंदवले मार्गावरील स्वाती मंगल कार्यालयासमोर छापा टाकून विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत वाहनासह एकूण 2 लाख 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयित ओमनी (एमएच 12 एनयू 8943) अडवून तपासणी केली असता विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या विनापरवाना विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आल्या. पोलिसांनी मद्यसाठ्यासह संबंधित वाहन जप्त केले असून याप्रकरणी प्रकाश बाबुराव घोडके (वय 52, रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई सहदेव साबळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून सपोनि दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे करत आहेत. सलग दोन दिवस झालेल्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून बनावट व देशी दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई होणार का?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच या कारवाईनंतर काही ठिकाणी मटका व्यवसायाशी संबंधित टपऱ्या बंद ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT