सातारा

Satara Crime : हेळगावमध्ये घरासमोरील रस्त्यावर युवकाचा खून

कुर्‍हाड, कोयत्याने हल्ला, दोन्ही बाजूचे पाचहून अधिक जखमी

पुढारी वृत्तसेवा

मसूर : घरासमोरील रस्त्याच्या कारणावरून हेळगाव (ता. कराड) गावात रविवारी सकाळी सशस्त्र धुमश्चक्री झाली. कुर्‍हाड, कोयत्याने झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा खून झाला. तर अन्य पाच जण जखमी असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला.

सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रज्वल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून मसूर पोलिस ठाण्यात श्रीमंत ऊर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी, आयुष सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी, ओंकार उत्तम सूर्यवंशी, सचिन ऊर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी, रेश्मा सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी, सुनिता उत्तम सूर्यवंशी, तेजस्विनी संजय सूर्यवंशी, शालन रामचंद्र सूर्यवंशी व विद्या ओंकार सूर्यवंशी (सर्व रा. हेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला

पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोरील रस्त्यावरून सूर्यवंशी कटुंबात पूर्वीपासून वाद होता आणि याच वादाचे रूपांतर रविवारी सशस्त्र धुमश्चक्रीत झाले. श्रीमंत ऊर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी हा कुर्‍हाड, आयुष सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी हा लोखंडी टोचा, ओंकार उत्तम सूर्यवंशी हा कोयता, तर सचिन ऊर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी आणि रामचंद्र महादेव सूर्यवंशी हे लाकडी दांडके घेऊन आल्याचे नमूद केले. त्यांच्यासह अन्य व्यक्तींनी एकत्र येऊन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

सूरज सूर्यवंशी हा घराशेजारील बाथरूममधून घरात जात असताना त्याच्यावर अचानकपणे हल्ला झाला. हे पाहून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरही कुर्‍हाड, कोयता, दांडके आणि दगडांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी आणि रोहिणी भरत सूर्यवंशी हे जखमी झाल्याची नोंद पोलिसात आहे. दुसर्‍या बाजूचेही दोघेजण जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

परस्परविरोधी फिर्यादीची शक्यता...

या प्रकरणी ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, यावरूनही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे चौकशीनंतरच रविवारी सकाळी नेमके काय घडले? रविवारी सकाळी अचानकपणे वाद का उफाळून आला? हे समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT