तांब्याच्या तारावर महिला चोरट्यांचा डल्ला 
सातारा

Satara Theft : तांब्याच्या तारावर महिला चोरट्यांचा डल्ला

बांधकाम विभाग कार्यालयाजवळची घटना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयानजीक खोदलेल्या खड्ड्यात तांब्याच्या तारावर महिला चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे या महिला चोरट्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद मैदान परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यान बंदिस्त गटारांसाठी पाईप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करताना अनेक जलवाहिन्यासह केबल तुटल्या आहेत. मात्र या तांबे व जर्मनच्या केबलच्या तारावर महिला चोरट्यांनी डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे.सुमारे 5 ते 6 महिला एकत्र येवू तांबे, जर्मन व अन्य लोखंडी साहित्याची पाहणी करून त्यांच्यावर डल्ला मारताना दिसत आहेत. तसेच या महिला जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शासकीय रूग्णालय व अन्य शासकीय कार्यालयात येवून टेहळणी करत आहेत. त्यानंतर या महिला संबंधित कार्यालयातील लोखंडी वस्तूसह अन्य साहित्यावर डल्ला मारत आहेत. अनेकदा सुरक्षा रक्षकांनी या महिलांना अडवण्याचा प्रयत्न केला असता या महिलांनी संबंधित सुरक्षा रक्षकावरही हल्ले केले आहेत. त्यामुळे या चोरट्या महिलांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT