कोल्हापूर नाक्यावरून पाठलाग करण्यात आला  pudhari
सातारा

Satara Crime | दीड तासात असे घडले तीन कोटी लुटीचे थरारनाट्य

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरु असताना कराड डीवायएसपी कार्यालय, कराड तालुका पोलिस ठाण्याच्या परिसरात पडणारी वीज या इमारतीवरील वीज विद्युत रोहकाने (लाईटनिंग अरेस्टर) खेचून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस ठाण्यावर पडणारी वीज जणू 'अरेस्ट' (अटक) झाल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांची वायरलेस यंत्रणा ठप्प झाल्यानंतर अथक प्रयत्नांच्या शर्थीनंतर ती मध्यरात्री पूर्ववत झाली.

• पोलिस अधीक्षकांकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी

• संशयितांनी तीन वाहनांचा वापर केल्याचा कयास

• संशयितांकडून फिर्यादीच्या कारची तोडफोड

• आणखी काहींच्या सहभागाची शक्यता

कराड शहरात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जोरदार पाऊस पडत होता. विजांचाही अक्षरशः तांडव सुरु होता. अशातच कराड डीवायएसपी कार्यालय व कराड तालुका पोलिस ठाण्याच्या दिशेने बीज खाली येत होती. या परिसरात रुग्णालय, कराड प्रांत कार्यालय असून तेथे वीज विद्युत रोहक बसवलेले आहेत. कराड तालुका विठ्ठल कणसे यांच्या गाडीवर २६ साटवर २०२४ पासून चालक म्हणून काम करतात. तसेच निमसोडमधीलब अविनाश संजय पाडगे हा सुद्धा दोन वर्षांपासून चालक म्हणून काम करतो. अवधूत कणसे यांच्या सांगण्यावरून ते दोघे मुंबई ते हुबली असे वेगवेगळ्या लोकांचे पैसे, सोने हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच करण्याचे काम करतात. १३ ऑक्टोबरला ते दोघे बिंगमधून कार घेऊन मुंबईला गेले होते.

तेथे तीन कोटींची रक्कम गाडीच्या सीटमधील मोकळ्या काप्प्यात भरली होती. ते सोमबार, १४ ऑक्टोबरला सायंकाळी साठच्या सुमारास मुंबईतून हुबळीकडे जाण्यासाठी निपाले होते, मुंबईहून कराडकडे येत असताना शैलेश पाडगे कार चालवित होते, तर अविनाश घाडगे मागील सीटवर झोपले होते. कार रात्री सव्वाएक ते दीडच्या सुमारास कराडजवळील कोल्हापूर नाका परिसरात आल्यानंतर अचानकपणे एका चारचाकीने कारचा पाठलाग सुरू कला, त्यामुळे ढेबेवाडी फाट्यापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर शैलेश यांनी चारचाकीला पुढे जाण्यास जागा दिली. मात्र, ही गाडी अचानकपणे कारला आडवी मारण्यात आली, तसेच त्यातून दोघे संशयित उतरले. त्याचवेळी दचाकीवरून आणखी दोघे संशयित तेथे आले आणि एकाने हॉकी स्टिकने कारची काच फोडली. त्यानंतर चालक शैलेश याला बाजूच्या रिकाम्या सीटवर बसवून एक संशयित पुढे बसला, अन्य दोन संशयित पाठीमागील सीटवर अविनाश यांना मध्यभागी घेत बाजूला बसले. यावेळी दमदाटी व मारहाण करण्यास सुरुवात करत संशयितांनी कार विंगच्या दिशेने नेली.

एका संशयिताने चाकूचा धाक दाखवित कार विंगमधून गमेवाडी घाटाच्या दिशेने नेली. ठार मारण्याची धमकी देत तुमच्याकडे असलेले पैसे द्या, असे म्हणत जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी केली. त्यामुळे दोघांनी भीतीपोटी ३ कोटी रुपयांची रक्कम संशयितांना देण्यात आली. पैसे घेतल्यानंतर कार चिंगकमानीजवळ आणली. काहीवेळ संशयितांनी चर्चा केल्यानंतर शैलेश व अविनाश या दोघांचे डोळे रुमालाने चांधण्यात आले आणि याच कालावधीत आणखी एक कार त्या ठिकाणी आली. आलेल्या या कारमध्ये सुटलेले पैसे ठेवण्यात आले आणि त्यानंतर ती गाडी निघून गेली त्यानंतर नांदलापूरपर्यंत गाडी आणण्यात आली आणि संशचितांनी अविनाश यास त्यांची कार चालविण्यास सांगत कोठेही थांबायचे नाही अशी सूचना केली. त्यानंतर अविनाश घाडगे यांनी कार कासेगावपर्यंत नेली आणि पुन्हा देबेवाडी फाट्यापर्यंत आणली. त्यानंतर अवधूत कणसे यांच्यासोबत शैलेश व अविनाश यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT