सातारा

Satara Crime : चोरीची ५ लाखांची ७ वाहने जप्‍त

शहर परिसरासह तालुक्‍यात दुचाकी चोरी करणार्‍या दोन अल्‍पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शहर परिसरासह तालुक्‍यात दुचाकी चोरी करणार्‍या दोन अल्‍पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आतापर्यंत ७ दुचाकी चोरल्‍या असून ५ गुन्‍ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. दुचाकी चोरुन त्‍या विक्री करण्याच्या प्रयत्‍नात असताना बारक्‍या पोरांचा प्‍लॅन पोलिसांनी उधळून लावला.

दि. २९ ऑक्‍टोबर रोजी एका युवकाने गोडोली येथून एक मोटारसायकल चोरी केली असल्‍याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिस त्याबाबत माहिती घेत असताना तांत्रिक माहितीचे आधारे संशयित आरोपीचे नाव समजले. सातारा शहर ठाण्याचे गुन्‍हे प्रकटीकरण (डीबी) विभागाचे पोलिस ३ दिवसांपासून त्या मागावार होते. दोन्‍ही संशयितांना सातारा शहरातील मोळाचा ओढा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते विधीसंघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी संशयित मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पालकांसमोर पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता त्यांनीे सातारा शहर परिसरातील विविध ठिकाणावरुन ४, सातारा तालुका परिसर येथून १ तसेच कोरेगाव रेल्वे स्टेशन पार्किग मधुन १ मोटार सायकल चोरी केल्‍याची कबूली दिली. दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने त्‍या लपवून ठेवल्‍या होत्‍या. पोलिसांनी त्‍या दुचाकी जप्‍त केल्‍या. एका मोटार सायकलचे चेसी व इंजिन नंबर खोडल्याने त्‍याबाबत अधिक तपास सुरु आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, वैभव माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT