जीवन संपविले.  Pudhari News Network
सातारा

Satara Crime : ‘धोंड्या’च्‍या महिन्‍यातच जावयाने संपविले जीवन

फलटण येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

फलटण : सासरवाडीतील सासू, सासरा व मेव्हण्यासह दहाजणांच्या जाचहाटाला कंटाळून जावयाने फलटण येथील लॉजमध्ये जीवन संपविल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंड्याच्‍या महिन्‍यात जावयांचे कोडकौतुक केले जाते. इथे मात्र धोंड्याच्‍या महिन्‍यातच जावयाने जीवन संपविल्याने खळबळ उडाली.

माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील किरण महादेव ढवळे याचा जून २०२१ मध्ये त्याच गावातील कोमल सावंत हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला होता. यासंदर्भातील प्रकरण माळशिरस न्यायालयात सुरू होते. किरण ढवळे याला ४ जूनपर्यंत सासरे दादासो निवृत्ती सावंत, चुलत सासरे शहाजी निवृत्ती सावंत, विजय निवृत्ती सावंत, चुलत मेहुणे आदित्य शहाजी सावंत, यश विजय सावंत, चुलत सासू मनीषा शहाजी सावंत, मेहुणी मयुरी दादासो सावंत, साक्षी विजय सावंत व शहाजी उत्तम मगर (सर्व रा. दहिगाव) आणि बापू लक्ष्मण चव्हाण (रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस) हे वारंवार त्रास देत होते.

यामुळे ढवळे याने फलटण येथील एका लॉजमध्ये विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला असल्याचे शीतल महादेव ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दहिगाव व चंद्रपुरी येथील दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT