महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार (File Photo)
सातारा

Satara Crime : महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार; एकावर गुन्हा

वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

वडूज : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडूज येथील एकावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

संग्राम सुखदेव खुडे (वय 21) असे या युवकाचे नाव आहे. या युवकाने दहिवडी येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षे वयाच्या पीडित युवतीस लग्नाचे आमिष दाखवून पिंपळवाडी व दहिवडी येथील एका हॉटेलवर नेऊन अत्याचार केले. काही वेळा युवतीस कोल्डड्रिंक म्हणून दारू पाजून जबरदस्तीही केली. त्याचबरोबर संशयिताने पिढीत युवतीची आर्थिक लुबाडणूकही केली आहे. हा प्रकार गेली वर्षभर सुरू आहे. पीडित मुलीस त्रास होऊ लागल्यानंतर ती व आई सातारा येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या असता त्यांना पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजले. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनासाठी पी. एस. आय. कर्चे यांनी संशयित खुडे याला तातडीने अटक करून वडूज येथील न्यायालयात हजर केले असता न्या. दर्यावर्दे यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT