अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला सश्रम कारावास 
सातारा

Satara Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला सश्रम कारावास

20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंडाची न्यायालयाने सुनावली शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

वडूज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी महेश वसंत गलांडे (वय 39, रा. नागाचे कुमठे, ता. खटाव, जि. सातारा) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपी महेश गलांडे याने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्याशी संबंधित संभाषणाचे रेकॉर्डिंग दाखवण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप होता. 23 डिसेंबर 2018 ते 15 जानेवारी 2019 या कालावधीत वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद आहे. तसेच घटनेची माहिती दिल्यास रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले. फिर्यादी अल्पवयीन असल्याने व वैद्यकीय अहवाल तसेच कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर यांनी केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. अजित कदम-साबळे यांनी काम पाहिले. एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या खटल्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तसेच औंध पोलीस ठाण्याच्या पथकाने सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT