दहिवडी : माण तालुक्यातील एका गावात महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ती घराजवळील शिवारात मेंढ्या चारत होती. त्यावेळी संशयिताने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडितेने प्रतिकार केला असता तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीत तिच्या हातातील काचेच्या बांगड्या फुटून तिला दुखापत झाल्याचेही तिने म्हटले आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित शंभुराज अधिकराव ओंबासे याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.