सातारा

Satara Crime: लोणंदमध्ये दांडक्याने मारहाण; एकाचा मृत्यू

लोणंद बसस्थानक परिसरात दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दांडक्याने मारहाण केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

लोणंद : लोणंद बसस्थानक परिसरात दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दांडक्याने मारहाण केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्‍यात झाली आहे.

युवराज पोपट जगताप (रा. लोणंद, ता. खंडाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी लोणंद पोलिसांनी विजय संजय नालट (रा. बुरूड गल्ली, ता. कोरेगाव) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद बसस्थानक परिसरात काही कारणातून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका व्यक्तीने दुसऱ्यावर दांडक्याने हल्ला केला. दांडक्‍याने जोरदार वार झाल्‍याने युवराज जगताप यांचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. युवराज हे लोणंद येथील एका वीटभट्टीवर काम करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT