वेणेगाव : बोरगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अट्टल दुचाकी संशयित चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी, एक बेवारस दुचाकी व मोबाईल असा एकूण ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत नागठाणे, वळसे व बोरगाव येथील दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
बशीर वली शेख (रा. गेंडामाळ, आकाशवाणी झोपडपट्टीजवळ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताला काशीळ बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीची बेवारस दुचाकी व १५ हजार रुपयांचा मोबाईल आढळून आला. त्यानंतर केलेल्या तपासात त्याने बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागठाणे, वळसे व बोरगाव येथून चार दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणातील एक संशयित फरार आहे. सपोनि प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत पोलिस हवालदार निलेश गायकवाड, दीपक मांडवे, विजय म्हेत्रे, जयवंत बुधावले, प्रविण नावडकर, सुनील कर्णे, पोलिस नाईक प्रशांत चव्हाण, जगदिश कणसे, नंदकुमार कचरे, दीपक देशमुख, धीरज महाडीक, केतन जाधव, सतीश पवार, सुमित साळुंखे, अमोल कणसे, विशाल जाधव, समाधान जाधव, अनिकेत यादव, धनराज साळुंखे यांनी सहभाग घेतला.