Crime pudhari photo
सातारा

Satara Crime : लल्‍लनसह टोळीवर खंडणीचा गुन्‍हा

लल्लन जाधव याच्यासह पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यात धंदा करायचा असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर तुला व तुझ्या घरातल्यांना खल्लास करीन, अशी धमकी एका दुकानदाराला देण्यात आली. या प्रकरणी प्रतापसिंह नगरातील लल्लन जाधव याच्यासह पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अजय ऊर्फ लल्लन दत्तात्रय जाधव, विजय ऊर्फ बंबारू दत्तात्रय जाधव, ओमकार भरत देठे, सर्जेराव ऊर्फ छोट्या पांडुरंग कांबळे (सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहसिन कासम मुल्ला (वय २७, रा. विकास नगर खेड, सातारा) यांचे इलेक्ट्रॉनिक आणि होम अप्लायन्सेसचे दुकान आहे. लल्लन जाधव याने त्याच्या साथीदारासह मुल्ला यांच्या घरी जाऊन त्यांना एक लाखाची खंडणी मागितली.

मात्र, त्यांनी खंडणी देण्यास नकार देताच त्यांना काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाघेरी (ता. कऱ्हाड) येथून बळजबरीने त्यांच्या कारमध्ये बसवून साताऱ्यात घेऊन येण्याचा प्रयत्न केला. तसेच वारंवार त्यांच्या घरी येऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT