File Photo
सातारा

Satara Crime: नराधमाला ‌‘पॉर्न‌’ बघायचा नाद

पोलिसांसमोर कबुलीनामा : जुन्या रागातूनच खून केल्याची बतावणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सासपडे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी संशयित राहुल यादव याला सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने हत्येचा कबुलीनामा देत धक्कादायक माहिती देण्यास सुरुवात केली आहे. संशयिताला पॉर्न (अश्लील) व्हिडीओ बघण्याचा नाद होता. तसेच, जुन्या रागातून हे कृत्य केल्याचे तो सांगत आहे. तो देत असलेल्या माहितीची पोलिस खातरजमा करत तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, संशयित राहुल यादव याला सातारा जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने (दि. 18) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

राहुल बबन यादव (वय 35, रा. सासपडे) याने शुक्रवारी दुपारी शाळकरी मुलीचा निर्घृण खून केला. पोलिसांनी अवघ्या सहा तासात त्याला अटक केली. संशयिताच्या अटकेनंतर शेकडोंचा जमाव संतप्त बनला. संशयित राहुल यादव याच्या घरावर हल्लाबोल करत तोडफोड केली. राहुलवर आरोपांची जंत्रीच जमावाने सांगण्यास सुरुवात केली.

संशयित राहुल यादव याने पोलिसांकडे कबुली जबाब देताना शाळकरी मुलीचा खून केल्याचे मान्य केले आहे. खुनावेळी ती घरी एकटीच असल्याची खात्री झाली. यामुळे तिला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने जोरदार प्रतिकार केला. मात्र त्याच्या ताकदीपुढे ती निष्प्रभ ठरली. तिला उचलून जात्यावर आपटत वरंवटा डोक्यात घातला असल्याची माहिती राहूलने पोलिसांना दिली.

पोलिसांचे एक पथक राहूल यादवची झाडाझडती घेत आहे. दुसरे पोलिसांचे पथक त्याचा मोबाईल स्कॅन करत तांत्रिक माहिती घेत आहेत. राहूल यादवच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला अश्लिल व्हिडीओ बघण्याचा नाद आहे. पोलिसांनी मोबाईल हिस्ट्री तपासली असता तसे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT