Fraud Case pudhari
सातारा

Satara Crime : फसवणूकप्रकरणी महिलेवर गुन्‍हा

तारण न देता तीन कोटींचे आमिष : सातार्‍यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातार्‍यातील बांधकाम व्‍यावसायिकाला कोणतेही तारण न घेता ३ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. संबंधित फायनान्‍स कंपनी पुण्याची असल्‍याचे सांगून महिलेने ६ लाख ३६ हजार ८०० रुपयांची रक्‍कम घेतली असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

निता नितीन घोडके (रा. सदरबझार, सातारा) या महिलेविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला. याप्रकरणी राजेंद्र तुकाराम गायकवाड (वय ५०, रा. गोडाेली, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना १७ ऑक्‍टोबर २०२४ ते २८ जून २०२६ या कालावधीत घडली आहे. तक्रारदार हे बांधकाम व्‍यावसायिक आहेत. बांधकाम साईटसाठी त्‍यांना कर्ज पाहिजे असल्‍याने संबंधित महिला ऐश्वर्या फायनान्‍स कंपनीकडून कर्ज देत असल्‍याचे समजले. त्‍यानुसार त्‍यांनी महिलेला संपर्क केला. महिलेने एका महिन्‍यात ऐश्वर्या फायनान्‍स कंपनीकडून ३ कोटी रुपयांचे कर्ज विना तारण देतो, असे सांगितले. त्‍यासाठी बांधकाम व्‍यावसायिकाकडून त्‍यांची आवश्यक ती कागदपत्रे घेतली.

फायनान्‍स कंपनीचे कर्ज मंजूर होत असल्‍याचे सांगून महिलेने त्‍यांच्याकडून प्रोसेसिंगसह इतर कर्ज प्रक्रियेचे पैसे म्‍हणून ऑनलाईन वेळोवेळी ६ लाख ३६ हजार ८०० रुपये घेतले. पैसे दिल्‍यानंतर बरेच दिवस उलटून गेल्‍यानंतरही कर्जाची रक्‍कम मिळत नव्‍हती. यामुळे तक्रारदार यांनी महिलेला संपर्क केला. मात्र, महिलेने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर अखेर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT