सातारा

Satara news: न्यायालयाचे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे

अनिल देसाई, संदीप मांडवे यांना जामीन : मारहाण झाल्याचेही स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी दाखल झालेल्या अपहरण प्रकरणात महाबळेश्वर न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जामीनही मंजूर केला आहे. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर व तितक्याच रकमेच्या हमीदारावर तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला ‌‘कारणे दाखवा‌’ नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळाचे पडसाद राज्यभर उमटले होते. या प्रकरणात झेडपी सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे आणि वाई पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे यांच्याविरुद्ध महाबळेश्वर येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा विकास दिनकर शिंदे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT