सातारा

Satara Theft: तांब्याची तार चोरणारी टोळी पोलिसांकडून गजाआड

तिघांना अटक : 1 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पवनचक्कीमधील तांब्याच्या तार असलेल्या केबल वायरची चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला जेरबंद करून चोरीचे दोन गुन्हे उघड केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पाटण पोलिसांनी संशयितांकडून 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकाश निवृत्ती निकम (वय 34), नवनाथ गुलाब कदम (23), पंकज आनंदा कदम (25, तिघे रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सडावाघापूर व वनकुसवडे परिसरात 2025 ते 2026 या कालावधीत पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल वायर चोरीच्या घटना घडल्या आहेत. पाटण पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) व पाटण पोलिस संशयितांचा शोध घेत होते. तांबे चोरणाऱ्यांची माहिती घेतली जात असताना एलसीबी पोलिसांना क्लू मिळाला.

एलसीबी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, तिन्ही संशयितांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी एकूण दोन गुन्हे केले असल्याचे सांगून 260 किलो वजनाची चोरीची केबल वायर पोलिसांना दिली. चोरीची वायर जप्त केली असता, ती 1 लाख 13 हजार रुपयांची असल्याचे समोर आले आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोनि विश्वजित घोडके, पोनि ए. बी. कवठेकर, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे, फौजदार परीतोष दातीर, विश्वास शिंगाडे, पोलिस राजू मुलाणी, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, सुजित भोसले, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, विशाल पवार, रोहित निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT