Satara Collectorate office threatened with bomb blast; Police on alert
सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब, आरडीएक्सने उडवण्याची धमकी देण्याबाबत ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. आज (बुधवार) काही शासकीय कार्यालयामध्ये हॉट मेल आल्यावर सातारा पोलीस हाय अलर्ट मोडवर गेले.
दुपारी एक वाजल्यापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण खाली करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पोलिसांनी चारी बाजूला वेढा दिला असून बॉम्ब शोधक पथक स्फोटक पदार्थाचा शोध घेत आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, बुधवारी हॉट मेलवर काही शासकीय कार्यालयात सातारा जिल्हाधिकारी आरडीएक्सने उडवणार असल्याचा मेल आला. सातारा पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत कलेक्टर ऑफिसमध्ये बंदोबस्त तैनात केला.
कलेक्टर ऑफीस मधील सर्वसामान्य नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून बाहेर पडले. बॉम्ब शोधक पथक आल्यानंतर त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली. सर्व नागरिक भीतीच्या छायेखाली असून सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याच वेळी साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांची धावपळ उडाली.