Shambhuraj Desai (File Photo)
सातारा

Satara ZP: बंद सीसीटीव्हीवरून नवा वाद उफाळला

झेडपी राड्यावेळी यंत्रणा डाऊन; पालकमंत्र्यांकडून चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी मोठा राडा झाला होता. याचे पडसाद राज्याच्या विधानसभा व विधान परिषदेत उमटले होते. हा सर्व ड्रामा जेथे झाला त्या जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसरातील सीसीसीटीव्हीच बंद असल्याचे आता समोर आले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

20 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये राडा झाला. या प्रकरणाची चर्चा संपत नाही तोवरच राडा झाला त्यावेळी सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने नवीन वादाला उकळी फुटली आहे. जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील मुख्य प्रवेशद्वार येथे पीओपीचे काम करताना सीसीटीव्हींच्या केबल तुटल्या गेल्या आहेत. त्यामुळे निवडीवेळी झालेल्या राड्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळणार नसल्याचे समोर आले आहे.

या प्रकाराबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ज्या दिवशी निवडणूक झाली, त्या दिवशी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या दोन सदस्यांनी सीईओ व जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषद परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे व जिल्हाधिकाऱ्यांनी सभागृहामध्ये केलेले प्रोसिडिंग मिळावे असे पत्र दिले होते; मात्र अद्याप त्याचे उत्तर मिळाले नाही. सदस्य वारंवार चौकशीही करत आहेत; पण प्रशासनाकडून याबाबतीत काहीही सांगितले जात नाही. 16 मार्चपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, ही बाब गंभीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT