Car Pudhari
सातारा

Satara Car Theft: टेस्‍ट ड्राईव्‍हचा बहाणा करुन शोरुममधील कार लांबवली

औद्योगिक वसाहतीतील एका चारचाकीच्‍या शोरुममध्‍ये आलेल्‍या अज्ञाताने टेस्‍ट ड्राईव्‍हच्‍या बहाण्‍याने १६ लाखांची चारचाकी लांबवली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : येथील जुन्‍या औद्योगिक वसाहतीतील एका चारचाकीच्‍या शोरुममध्‍ये आलेल्‍या अज्ञाताने टेस्‍ट ड्राईव्‍हच्‍या बहाण्‍याने १६ लाखांची चारचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

कारंडवाडी येथील नवनाथ कॉलनीत स्‍वप्‍नील सुरेश बोभाटे हे राहण्‍यास आहेत. ते जुन्‍या औद्योगिक वसाहतीतील चारचाकी शोरुममध्‍ये नोकरीस आहेत. रविवार दि.५ जुलै रोजी सकाळी शोरुममध्‍ये एक व्‍यक्‍ती आली. त्‍याने चारचाकी खरेदी करणार असल्‍याचे सांगत टेस्‍ट ड्राईव्‍हची मागणी केली.

चारचाकीच्‍या इंजिनमधून आवाज येत असल्‍याचा बहाणा करत आत असणाऱ्या अज्ञात संशयिताने स्‍वप्‍नील बोभाटे यांना खाली उतरवले. यानंतर संशयित १६ लाखांच्‍या चारचाकीसह निघून गेला. तक्रारीनुसार अज्ञातावर चोरीचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून तपास महिला कर्मचारी देखणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT