Bribery Case Pudhari
सातारा

Satara bribery case: लाच घेणाऱ्या शिपायाला एक दिवसाची पोलिस कोठडी

सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेरील शिपायाला 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेरील शिपायाला 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. आनंदा गोपाळ वाळवेकर (वय 58, रा. सोनगाव, ता. सातारा) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र या सुविधा चालू करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने मिळण्याकरता जिल्हा रुग्णालयात प्रकरण दाखल केले होते. हे प्रकरण तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यावेळी तक्रारदार हे डॉ. करपे यांच्या केबिनबाहेरील शिपाई आनंदा वाळवेकर यांना भेटले असता त्यांनी डॉ. करपे यांच्याकरता 50 हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

17 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा रुग्णालयात सापळा रचून वाळवेकर याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे चौकशी करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT